breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यात बस स्टॉप चोरीला, शोधून देणा-यास 5 हजारांचे बक्षीस
पुणे – पुणेकरांचा एक किस्सा नाही, ज्यावर चर्चा होणार नाही. मुळात पुणे तिथे काय उणे, असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. पुणेरी पाट्यांपासून ते फ्लेक्सबाजीपर्यंत टोमणे आणि टुचकुले घेण्याची पुणेकरांची सवय संबंधिताला ताळ्यावर आणण्यासाठी काफी आहे. आता सोशल मीडियावर पुण्यातील एक बस स्टॉप चोरीला गेल्याचा फोटो व्हायरल होत आहे.
पुण्यातील बी. टी. कवडे रोडवरील देवकी पॅलेससमोरील बस स्टॉप चोरीला गेल्याचा दावा या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय जो कोणी हा बस स्टॉप शोधून देईल त्याला 5000 रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्यात काय चोरीला जाईल त्याचा काही नेम नाही.