breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात पुन्हा जुन्या वाड्याची भिंत कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही

पुण्यातील गणेश पेठ परिसरातील बोरा हॉस्पिटल येथे एका जुन्या वाड्याची भिंत कोसळण्याची घटना घडली आहे. घराची भिंत पडत असल्याचे वेळीच लक्षात येताच आई आणि मुलगा बाहेर पळाल्याने बचावले आहेत. या दुर्घटनेत संबंधीत घरातील वस्तूंचे नुकसान वगळता इतर कोणतीही मोठी हानी झालेली नाही. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली.

पुण्यात गेल्या आठवडाभरापासून अधूनमधून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहर परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून सूर्याचे दर्शनही झालेले नाही. त्यातच शहरातील मध्यवर्ती पेठांच्या भागामध्ये अजूनही काही जुन्या वाड्यांमध्ये लोकांचे वास्तव्य आहे. हे वाडे मातीचे आणि लाकडी बांधकामाचे असल्याने पावसामुळे भिजून या वाड्यांची पडझड होत आहे. त्यातच आजची घटना घडली आहे.

गेल्या महिनाभरात पुणे शहरात पावसामुळे भिंत पडल्याच्या दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. यामध्ये कोंढवा येथील आल्कन स्टायलस या सोसायटीची संरक्षक भिंत बाजूच्या कामगारांच्या झोपड्यांवर पडल्याने १५ जणांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या एका घटनेत आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजच्या कँम्पसमध्ये सीमाभिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर ९ जण जखमी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button