breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात पावसाने घातलेल्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत

पुणे शहरात बुधवारी घातलेल्या पावसानं पुणेकरांची अक्षरशः झोप उडवली आहे. संपूर्ण शहरात झालेल्या धुवाँधार पावसानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागांत नागरिकांच्या घरातही पाणी शिरले आहे. सिंहगड रस्ता परिसरात दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे.

धायरी
धायरीतील रस्ता कालच्या पावसात वाहून गेला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या पुरात वाहून गेला होता त्यामुळं आठ महिन्यांपूर्वी नवीन बनवण्यात आला होता.

येरवडा स्थानक
येरवडा पोलिस ठाण्यातही पावसाचे पाणी शिरले आहेत

मेडिकलमध्ये शिरले पाणी
मेडिकलमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर औषधाचे नुकसान झाले. मेडिकलमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर औषधाचे नुकसान झाले.

पुणे हडपसर
काल झालेल्या मुसळधार पावसाने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे शहरात झाडपडीच्या १० तर विविध भागात पाणी साठल्याच्या ४५ घटनांची नोंद. बारामतीतील कऱ्हा नदीदेखील दुथडी भरुन वाहत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button