पुण्यात पाळला जातोय कडक लॉकडाऊन, वाहनांची होतेय कसून तपासणी
पुण्यात आजपासून म्हणजे 14 जुलै ते 23 जुलै पर्यंत दोन टप्प्यात कोरोना व्हायरस लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. दरम्यान यामध्ये आता उद्योग, आयटी कंपनी यांना 15% मनुष्यबळासह कार्यालयं खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहेत. मात्र त्यासाठी एक विशेष पास दिला आहे.
पुण्यात पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहनं तपासून विनाकारण बाहेर पडलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र यामुळेच आज सकाळी शिवाजीनगर परिसरामध्ये ट्राफिक जाम पहायला मिळालं आहे. सहायक पुलिस निरीक्षक रणजीत मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून सार्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे आणि त्यामुळे हे ट्राफिक जॅम होत आहे. केवळ पास धारक आणि अत्यावश्यक सेवेमधील लोकांनाच पुढे प्रवासाची परवानगी दिली जाणर असल्याचं त्यांनी सांगतिलं…
दरम्यान हिंजवडी सारख्या आयटी हब म्हणून ओळखल्या भागात आजूबाजूच्या परिसरातून अनेक कर्मचारी येतात. आता पुण्यात लॉकडाऊन जरी असला तरीही नाकेबंदी, वाहनांची कसून तपासणी यामुळे रस्त्यांवर ट्राफिक जॅम आहे.
पुणे शहरामध्ये 14 जुलै त1 19 जुलै आणि 19 जुलै ते 23 जुलै असा दहा दिवसांचा लॉकडाऊन 2 टप्प्यांत पुन्हा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 14 जुलैच्या मध्यरात्री 1 वाजल्यापासून लॉकडाऊन पुन्हा कडक करण्याचे आदेश दिल्यानंतर आता सकाळपासून नाक्यानाक्यावर चोख बंदोबस्त ठेवला जात आहे. पुण्यात काल (13 जुलै) रात्री पर्यंत पुणे मनपा मध्ये एकूण 29612 रूग्णांची नोंद आहे तर 897 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 6815 रूग्णांची नोंद आहे तर 123 मृत्यू नोंदवले गेले आहेत.