पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/1-3-1.jpg)
पुणे : पुण्यात एका निवृत्त शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन (61) असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यात सातत्याने कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. पुण्यातील एका निवृत्त शास्त्रज्ञांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मात्र व्हेंटिलेटर न मिळाल्याने त्या निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन असे या निवृत्त शास्त्रज्ञाचे नाव आहे. ते पुण्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियातून ते वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते. त्यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.