breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यात दगडाने ठेचून गुंडाची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/shailesh-ghadage.jpg)
पुणे | पुण्याच्या खराडी भागात एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली आहे. मोकळ्या मैदानात दगडाने ठेचून त्याला ठार मारण्यात आलंय. शैलेश घाडगे असं हत्या झालेल्या कुख्यात गुंडाचं नाव आहे. आज पहाटेच्या सुमारस खराडी परिसरात ही घटना घडलीये. मारेकऱ्यांनी डोक्यात दगड घालून त्याची हत्या केलीये. अनेक गुन्ह्यांमध्ये शैलेश आरोपी होता. शैलेशच्या नावावर अनेक गुन्हे नोंद आहेत.