breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात कोरोनामुळं डॉक्टरच्या मृत्यूची अफवा; जाणून घ्या वास्तव – वाचा सत्य

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना लॉकडाऊनमध्ये सगळ्यांत मोठी समस्या असेल तर ती सोशल मीडियावरील अफवांची, रोज एक नवी अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. पुण्यात आज, एका महिला डॉक्टरचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. रास्ता पेठेत राहणाऱ्या डॉ. मेघा श्रीकांत व्यास- शर्मा (वय 33) यांच्या मृत्यूबाबत फेसबुक, व्हाट्सएपवर उलट- सुलट चर्चा असलेला मजकूर फिरत आहे.

सोशल मीडियावरील दाव्यांविषयी त्यांचे पती डॉ श्रीकांत शर्मा यांच्याशी संपर्क केला. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मी पुणे येथे डॉक्टर आहे. माझी पत्नी एक गृहीणी होती. सोशल मीडियावर तिच्या निधनाविषयी अनेक चुकीचे दावे करण्यात येत आहेत. त्यामुळे आमच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मेघा यांच्या विषयी खोट्या पोस्ट न पसरविण्याचे आवाहन शर्मा कुटुंबाने केले आहे.

खबरदार! खोट्या पोस्ट शेयर कराल तर…

मेघा यांच्याविषयी खोटी पोस्ट शेयर करणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार करत असल्याचे डॉ. श्रीकांत यांनी सांगितले आहे. “माझ्या पत्नीच्या फोटोचा गैरवापर करून असत्य दावे केले जात आहेत. जे कोणी असे करेल त्यांच्याविरोधात आम्ही पोलिसांमध्ये तक्रार देणार आहोत. त्यामुळे कोणीही खोट्या पोस्ट शेयर करू नये,” असा इशार त्यांनी दिला.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेल्या फोटोतील महिलेचे खरे नाव मेघा श्रीकांत शर्मा (वय 33) असून, त्या डॉक्टर नाहीत. तसेच त्यांचे निधन कोरोनामुळे झालेले नाही. त्या पुणे येथील एक गृहिणी होत्या. सोशल मीडियावर त्यांच्याविषयी खोट्या पोस्ट व्हायरल होत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button