breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील वडगाशेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण

पुणे । प्रतिनिधी

देशासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. लोकप्रतिनिधींना देखील या आजाराची लागण होत असल्याचे समोर आले आहे. आता वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.

आमदार सुनील टिंगरे यांनी माहिती दिली की, लक्षणे आढळल्यानंतर चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे.

मागील काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी देखील विशेष काळजी घ्यावी व लक्षणे असल्यास सेल्फ क्वारंटाईन व्हावे, अशीही विनंती टिंगरे यांनी केली आहे.

टिंगरे हे वडगावशेरी मधील गणेशनगर येथे झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी कोणताही सोशलडिस्ट्न पाळला गेला नव्हता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button