breaking-newsपुणे

पुण्यातील मोहसीन शेख हत्याकांडातील आरोपी देसाईची जामिनावर सुटका

पुणे – हडपसर परिसरात मोहसीन शेख हत्याकांड घडले होते. त्या प्रकरणी अटकेत असलेला हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पंन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायमूर्ती साधना जाधव यांनी देसाईची जामीनावर सुटका केली आहे.

२०१४ साली सोशल नेटवर्किंग साईटवर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे पुण्यात दोन गटात हाणामारी झाली होती. याच संशयावरुन हडपसर येथे २ जून २०१४ मध्ये आयटी क्षेत्रातील मोहसीनची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेचे धनंजय देसाई यांच्यासह २३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी आपल्याला जामीन मिळावा यासाठी देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. अभिजीत देसाई यांच्यामार्फत जामीन अर्ज केला होता. त्यावर सुनावणी घेताना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना पंन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजुर केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button