पुण्यातील जम्बो कोव्हीड सेंटरमधील 120 कर्मचाऱ्यांनी राजीनामा का दिला ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/covid-3-1-e1598204846593.jpg)
पुण्यातील जम्बो कोव्हीड सेंटरमधील 120 कर्मचाऱ्यांचानी राजीनामा दिला आहे. यामध्ये ४० डॉक्टर स्टाफ, ८० नर्सिंग स्टाफचा समावेश आहे. राजीनाम्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. दोन दिवसांपूर्वी जम्बो मध्ये सुविधांचा अभाव असल्याची ऑडीओ क्लिपही व्हायरल झाली होती. औषध साठा, उपचार सामुग्रीचा पुरवठा होत नसल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या.
पुण्यातील हे जम्बो कोविड रुग्णालय सुरू झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. या ठिकाणी रूग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप वारंवार करण्यात येत आहे. हे रुग्णालय चालवण्यासाठी पुरेसे डॉक्टरही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत आणखी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याने या रुग्णालयात पुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. पुण्यातील कोवि़ड-19 ची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने हे जम्बो हॉस्पिटल तयार करण्याचा निर्णय घेतला.
यासाठी तब्बल 80 कोटीहून अधिक खर्च आला आहे. परंतु हे रुग्णालय सुरू झाल्यापासून सातत्याने वाढत आहे. रुग्णालयात पुढे डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्यानंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे.