breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यातील कात्रज येथील कचरा प्रकल्पाला भीषण आग
पुणे – कात्रज येथील आंबेगाव कचरा प्रकल्पाला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळणातच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सध्या आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव येथील कचरा प्रकल्पास आज दुपारच्या सुमारास आग लागली. अचानक आग लागल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांसह पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कचरा प्रकल्प असल्याने काही क्षणात आगीचे आणि धुराचे लोळ आकाशात पसरले. त्यामुळे परिसरात धुर खूप दूर पर्यंत पसरला आहे. तसेच ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले असून, ही आग नेमक्या कोणत्या कारणास्तव लागली. हे अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच आगीच्या घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत.