पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सीरमला भेट देत घटनास्थळाची पाहणी करणार
![Deputy Chief Minister Ajit Pawar's visit to Kolhapur canceled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/ajit-pawar-1.jpg)
पुणे – कोरोनावर लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली आहे. हडपसर जवळील गोपाळ पट्टीतील असणाऱ्या सिरमच्या प्लांटला ही आग लागली आहे. अग्निशामक दालाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. कोरोना संसर्गावर लस तयार करणार्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागल्याची घटना आज (२१ जानेवारी) दुपारच्या सुमारास घडली. मांजरीच्या बाजूकडे असलेल्या मागील गेटच्या बाजूला नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या सीरमला जाऊन घटनास्थळाला भेट देणार आहे.
वाचा :-Breaking News : कोव्हिशिल्ड लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग
सीरम इन्स्टिट्यूमधील कर्मचार्यांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानंतर 10 अग्निशमन दलाच्या गाड्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली आहे. मात्र आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे समजू शकलेले नाही.मांजरी येथील या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. त्या विभागाला ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत आहेत. यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आहे.
दरम्यान, सीरमकडून आलेल्या स्पष्टीकरणानुसार कोरोना तयार होत असलेल्या कोव्हिशिल्ड ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. कोरोना लसी कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. अग्नीशमन दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत. आतापर्यंत तीन लोकांना वाचविण्यात आले आहे. दरम्यान, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग मोठ्या प्रमाणावर लागली आहे.