breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून डॉ राजेश देशमूख यांची नियुक्ती
पुण्याचे आधीचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची थेट पंतप्रधानांच्या कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या रिक्त जागी कोणाला रुजू करायचे हा प्रश्न पडला होता. मात्र, आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून डॉ राजेश देशमूख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ राजेश देशमुख हे हाफकीन इन्सटीट्यूटमध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. आता त्यांच्या जागी डॉ कुणाल खेमनार यांची नियुक्त करण्यात आली आहे. दरम्यान, गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पत्राद्वारे ही माहिती देशमुख यांनी कळवली आहे.