Breaking-newsपुणे
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 6 टीएमसी पाणीसाठा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/pune-khadakwasla-dam.jpg)
पुणे :पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये सुमारे सहा टीएमसी पाणीसाठा आहे. यंदा पावसाने सलामीलाच चांगली हजेरी लावल्याने पाणीसाठ्याची स्थिती चांगली. मोसमी पावसाच्या सुरुवातीच्या काळात धरणांमध्ये एवढा पाणीसाठा नसतो. पण यावेळी पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे.
टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मिळून १५ जून रोजी सहा अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे.
गतवेळी पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरणांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती चांगली होती. त्यातच निसर्ग चक्रीवादळामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस पडला.
ग्रामीण भागाला दुसरे उन्हाळी आवर्तन सध्या सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये सहा टीएमसी पाणीसाठा आहे.