Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुणे विद्यापीठातील वासातीगृहात विध्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Pune-student.jpg)
पुणे: पुणे विद्यापीठात एम.कॉमच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. हृषिकेश संजय आहेर असं त्याचं नाव असून, तो मूळचा अहमदनगरचा रहिवासी होता.
हृषिकेश विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत होता. तो नेहमीप्रमाणे आज पहाटे उठला. त्यानंतर तो अंघोळीसाठी गेला. काही वेळानंतर खोलीतील इतर सहकाऱ्यांना तो बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळला. त्यांनी याबाबत वसतिगृहातील सुरक्षा विभागाला माहिती दिली. त्यानंतर हृषिकेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.