पुणे विद्यापीठातर्फे पदवी प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ
![पुणे विद्यापीठातर्फे पदवी प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Pune-University.jpg)
पुणे |महाईन्यूज|
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. मात्र, अजूनही काही विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका न मिळाल्याने पदवी प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने दि. 15 जानेवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
पुणे विद्यापीठाचा 118वा पदवी प्रदान समारंभ मार्च-एप्रिल 2021मध्ये होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने पदवी व पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहे. त्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे.
मात्र, पहिल्याच वर्षी झालेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. पण अजूनही काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत मूळ गुणपत्रिका प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे पडला होता.