पुणे-लोणावळा लोहमार्गावर तिसर्या डोळ्याची नजर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/1-11.jpg)
पुणे – पुणे-लोणावळा लोहमार्गावरील स्थानके आता अधिक सुरक्षित होणार आहेत. 65 किलोमीटरच्या मार्गावर आता तिसर्या डोळ्याचा वॉच राहणार आहे. उपनगरीय असणार्या या मार्गावरील चौदा स्थानकांवर येत्या मार्च महिन्यापर्यंत ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, त्याचे फुटेज आरपीएफच्या कंट्रोल रूममध्ये असेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
निर्भया निधीअंतर्गत हे सीसीटीव्ही बसविले जाणार असून, रेल टेल कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड, घोरावाडी, कान्हे, मळवली या स्थानकांवर गुन्हेगारीच्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांत वाढ झाली असून, बसविण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे उत्तम दर्जाचे, तसेच नाईट व्हिजन असणारे असतील, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, पिंपरी स्थानकाजवळ असणार्या झोपडपट्टीमुळे भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले असून, रात्री आठ वाजेनंतर आरपीएफचे जवान स्थानकात तैनात ठेवण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.