breaking-newsपुणे
पुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक
पुणे – पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार लोकल गाड्या रद्द केल्या असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
यामध्ये दुपारी १२.१५ व एक वाजता सुटणाऱ्या दोन पुणे ते लोणावळा आणि दुपारी दोन वाजता आणि ३.४० वाजता सुटणाऱ्या दोन लोणावळा ते पुणे लोकल रद्द केल्या आहेत. हा ब्लॉक लोकलसाठी असल्याने कर्जत पॅसेंजर आणि मुंबईला जाणाऱ्या गाड्या सुरू राहतील.