breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे मेट्रोची शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, फडके हौद, मंडई आणि स्वारगेट ही स्थानके भूमिगत

पुणे |महाईन्यूज|

पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर ३१ ठिकाणी मेट्रो स्थानके उभारण्यात येणार आहेत. त्यातील शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, फडके हौद, मंडई आणि स्वारगेट ही स्थानके भूमिगत असणार आहे. या स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट, एस्केलेटर यांसह अनेक अत्याधुनिक सुविधा असतील.

पुणे मेट्रोच्या स्थानकांच्या आराखड्यात पुण्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, औद्योगिक वारसाचे प्रतिबिंब पुणेकरांना दिसणार आहे. शिवाजी महाराजांच्या मावळा पगडीपासून प्रेरणा घेऊन, डेक्कन, संभाजी उद्यान स्थानकांचे आकार केले आहेत.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या झाडांपासून प्रेरणा घेऊन संत तुकारामनगर, कासारवाडी, फुगेवाडी, दोपोडी, बोपोडी व खडकी स्थानकांचे डिजाइन करण्यात आले आहे. त्याला ऑरगॅनिक असे संबोधले आहे.

पीसीएमसी आणि भोसरी स्थानके औद्योगिक कारखान्याचे प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहेत. वनाज, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, नळ स्टॉप, गरवारे, आरटीओ, पुणे स्थानक, रुबी हॉल, बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी ही स्थानके बॅंड या प्रकारातील. त्यांची प्रेरणा पुण्याची सर्वांगीण प्रगतीपासून घेण्यात आली आहे.

  अत्याधुनिक सुविधा 
  प्रवाशांना स्थानकांवर पोचण्यासाठी लिफ्ट, एस्केलेटर आणि जिन्यांची व्यवस्था. 
  प्रत्येक मेट्रो स्थानकांवर चार प्रवेश आणि बाहेर पडण्याची व्यवस्था. 
  प्रत्येक मेट्रो स्थानक हे दुमजली. स्तर एक म्हणजेच कॉनकोर्स हा तिकिटे आणि इतर सुविधासाठी.
  स्तर दोन हा मेट्रो ट्रेनचा फलाट असणार. तेथून प्रवाशांना मेट्रोमध्ये चढउतार करता येईल. 
  महामेट्रोकडून एकूण १२१ लिफ्ट आणि १६५ एस्केलेटर बसविणार 
  मेट्रो स्थानकांवर प्रसाधन सुविधा, इलेक्‍ट्रॉनिक सूचना फलक, प्रवासी माहिती सुविधा, सीसीटीव्ही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button