breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या या गाड्या रद्द

पुणे – लोणावळा ते कर्जत दरम्यान असलेल्या बोरघाटात मंकीहील ते नागनाथ केबीन दरम्यान रेल्वेच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामकाजामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत होणार आहे. रेल्वेने या मार्गावरील पाच गाड्या ३१ डिसेंबर पर्यंत रद्द केल्या आहेत. तर काही रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

यंदाच्या मान्सूमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे घाट परिसरातील मंकीहील ते नागनाथ केबीन दरम्यान असलेल्या पुलाचा भाग खचला आहे. सध्याच्या घडीला लोणावळा कर्जत दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प असून लवकरात लवकर हा मार्ग पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे.

पूल दुरुस्तीच्या कामामुळे मुंबई-पंढरपूर मार्गावर धावणारी २८ डिसेंबरची तर पंढरपूर-मुंबई पॅसेंजर ही २९ डिसेंबरला धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय ५१०२९ मुंबई-विजापुर पॅसेंजर, ५१०३० विजापुर-मुंबई पॅसेंजर, ५१३१७ पनवेल-पुणे पॅसेंजर, ५१३१८ पुणे-पनवेल पॅसेंजर या गाड्या ३१ डिसेंबर रद्द करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button