पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत टेम्पो चालक-क्लिनरचा जागीच मृत्यू
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत शिरगावजवळ दोघांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी टेम्पोचालक आणि क्लिनर यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत शिरगावजवळ टेम्पोचालक आणि क्लिनर यांचे मृतदेह सापडले. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबईच्या दिशेने हे दोघे पिकअप वाहन घेऊन चालले होते. तेव्हा शिरगाव हद्दीत त्यांची गाडी बंद पडली. त्यानंतर हे चालक आणि क्लिनर पुण्याच्या दिशेने पायी निघाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
हेही वाचा : बायकोची आत्महत्या, अंत्यसंस्कारावेळी नवऱ्याचीही चितेत उडी, वाचवलेल्या नवऱ्याने पुन्हा विहिरीत जीव दिला
दोघे जण आपल्या वाहनापासून जेमतेम 600 ते 700 मीटर अंतरावर पोहचले असतील, त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने, ते पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या कडेला फेकले गेले. मृतदेहाची अवस्था पाहता हा अपघातच असल्याचे शिरगाव पोलिसांनी सांगितले.