पुणे पोलीस दलासाठी आनंदाची बातमी, तब्बल 173 पोलीस कर्मचारी करोनावर मात करून पुन्हा कामावर रुजू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/covid-Police-officials-get-sanitised-after-dispersing-migrant-workers-Bandra-Mumbai-pti-696x406-1.jpg)
महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचं सर्वांनाच माहित आहे.त्यातच आता पोलिसांमध्येही कोरोनाचा प्रसार वेगानं होतोय. मात्र या संदर्भातील पुणे पोलीस दलासाठी आनंदाची आणि मनोधैर्य उंचावणारी बातमी आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या तब्बल १७३ पोलीस कर्मचाऱ्यांनी करोनावर मात करून पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.
करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी झुंजणाऱ्या पुणे जिल्हा प्रशासनासाठी व पोलिसांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. शहर पोलीस दलातील १७३ अधिकारी व कर्मचारी करोनावर मात करून पुन्हा एकदा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. पुणे पोलीस दलातील २३६ जणांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. त्यात १८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
शहरात गेल्या चार ते साडेचार महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दररोज सर्वसाधारण हजार ते दीड हजार नागरिकांना या आजाराची लागण होत आहे. या आजाराचा प्रसार कमी व्हावा, यासाठी विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा, महापालिका तसेच पोलिस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. काहीही काम नसताना कोणीही घरातून बाहेर पडू नये, यासाठी गेल्या चार महिन्यांपासून पोलिस रस्त्यावर उतरून आपली ड्युटी करत आहेत.