breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात म्हाडा सोडतीची खुशखबर

पुणे – पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर येथील नागरिकांसाठी खुशखबर. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) पुणे विभागात ४ हजार ७५६ घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. यासाठी शनिवारपासून (ता.२) ऑनलाईन नोंदणीस सुरवात झाली.

रविवारपासून (ता.३) अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. १२ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तीन मे रोजी सोडत काढून लाभार्थ्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन अर्ज नोंदणीचे उद्‌घाटन करण्यात आले.

पुणे म्हाडाचे सभापती समरजितसिंह घाटगे, मुख्य अधिकारी अशोक पाटील, वित्तनियंत्रक विकास देसाई उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत सोडतीबाबत माहिती देण्यात आली. ‘म्हाडा’च्या सोडतीमध्ये पंतप्रधान आवास योजना, म्हाडा गृहनिर्माण योजना आणि २० टक्के अंतर्गत सर्वसमावेशक योजना, अशा तीन योजनांचा समावेश आहे. बाजारभावापेक्षा २५ टक्के कमी दराने घरांची विक्री केली जात आहे. वाचनालय, जीम, उद्यान अशा ॲमिनीटी दिल्या जातील, असे सामंत यांनी सांगितले. सोडतची प्रक्रिया ऑनलाईन आहे. जर एजंटच्या हस्तक्षेपाच्या तक्रारी आल्या, तर चौकशी करत न बसता थेट त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पुणे विभागात सर्वाधिक घरे
म्हाडाने काढलेल्या सोडतीमध्ये ८० ते ८५ टक्के घरे ही पुण्यात आहेत. ज्या अर्जदारांना घर हवे आहे त्यांना वॉट्‌सॲप व ईमेलद्वारे त्वरित माहिती दिली जाईल. गेल्या वर्षी म्हाडाने एकदा ३ हजार २१६ तर दुसऱ्या वेळी ८१६ घरांची सोडत काढली होती. आता ४ हजार ७५६ घरांची सोडत आहे, असे सभापती समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.

अर्ज भरण्यासाठी आणि सोडतीचे वेळापत्रक
अर्जासाठी नोंदणी – २ मार्च ते १२ मार्च २०१९
नोंदणी केलेल्यांना अर्ज करण्याची तारीख – ३ मार्च ते १२ मार्च २०१९
सोडतीची तारीख – ३ मे २०१९
सोडतीचे स्थळ – अल्प बचत भवन, पुणे
संकेतस्थळ – www.mhadamaharashtra.gov.in
https://lottery.mhada.gov.in 
हेल्पलाइन – ०२२-२६५९२६९२, ०२२- २६५९२६९३ , ९८६९९८८०००

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button