पुणे – पिंपरी चिंचवडमध्ये गुंडांचा हैदोस, 70 गाड्यांची तोडफोड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/12.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुण्यातील तळजाई वसाहतीमध्ये तीन गुंडानी दहशत माजवण्यासाठी तब्बल 55 गाड्या फोडल्यात त्यात 22 टु व्हिलर, टेम्पो, आणि रिक्षांचं मोठं नुकसान झालं. रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडलाय. यावेळी काही स्थानिक रहिवाशांनी त्यांना विरोध करताच त्यांनी कोयत्याचा धाक दाखवला आणि गाड्या फोडण्याचा कृत्य सुरूच ठेवलं यावरून केवळ दहशत माजवण्यासाठीच हा प्रकार घडलाय.
वाहन तोडफोडीची अशीच एक घटना आज पहाटे उघडकीस आलीय. पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने १2 वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. २) पहाटे अजंठानगर, चिंचवड येथे घडली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/1_thumb.jpg)
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास सात ते आठ जणांचे टोळके अजंठानगर परिसरात आले. त्यांनी लाकडी दांडके, दगड तसेच इतर हत्यारांनी परिसरातील तेरा वाहनांची तोडफोड केली. या घटनेतील एका आरोपीची ओळख पटलेली आहे. तो २०१७ मध्ये अजंठा नगर परिसरातून इतर ठिकाणी राहण्यास गेला आहे. पूर्ववैमनस्यातून त्याने हे कृत्य केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.