ताज्या घडामोडीमुंबई

जयदीप आपटेच्या मुसक्या आवळण्यास अखेर पोलिसांना यश

निशिगंधा आपटेने पोलिसांना दिली टीप, जयदीप आपटेच्या बायकोनेच केला गेम

ठाणे : गेल्या दहा दिवसांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेच्या मुसक्या आवळण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. कल्याण येथील घरातून बुधवारी रात्री आपटेला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे आपटेच्या पत्नीनेच त्याचा गेम केला आहे. आपटेची पत्नी निशीगंधाने पोलिसांना टीप दिली आणि पतीचा खेळ खल्लास केला. आपटेला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आपटेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सात पथकं स्थापन केली होती. तसेच सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी आपटेविरोधात लूक आऊट नोटीसही जारी केली होती. पोलिसांची सात पथकं आपटेचा कसून शोध घेत होते. मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता.

बुधवारी आपटेने पत्नी निशीगंधाला फोन करून आपण घरी असल्याचे कळवले. पत्नीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आपटेच्या कल्याणमधील घराजवळ सापळा रचला. आपटे घराजवळ येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आपटेने पोलिसांना शरण यावे आणि तपासकार्यात मदत करावे, अशी त्याच्या पत्नीची इच्छा होती. त्यामुळेच तिने स्वतः पतीची टीप पोलिसांना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आपटे एका मित्रासोबत राजकोट किल्ल्यावरील लोकेशनला भेट देण्यासाठी निघून गेला. त्यानंतर तो फरार झाला. त्याचे लोकेशन पोलिसांना सापडत नव्हते. बुधवारी रात्री पत्नीच्या मदतीने अखेर आपटे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button