Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा ‘पत्ता कट’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/freepressjournal_2020-05_ac720c14-5fd7-4f9e-858d-ee7bc38a184a_medha1.jpg)
पुणे । प्रतिनिधी
पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपने सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोथरुड विधानसभा मतदार संघातील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट झाला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विधानसभा मतदार संघ सोडावा लागल्यामुळे कुलकर्णी अगोदरच नाराज होत्या. पण, पक्षाकडून पुर्नवसन होईल, अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा कुलकर्णी यांच्या पदरी निराशा पडली आहे.
पुणे पदवीधर मतदार संघासाठी भाजपाकडून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे आदी नावांची चर्चा होती. मात्र, अखेर सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांनी बाजी मारली आहे.