breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपातर्फे संग्राम देशमुख यांना उमेदवारी

मुंबई | प्रतिनिधी

भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत उमेदवारांची नावं निश्चित केल्याची माहिती आहे. शिरीष बोराळकर, संग्राम देशमुख, संदीप जोशी आणि नितीन धांडे यांना भाजपने तिकीट दिले आहे. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपतर्फे सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे कोणत्या उमेदवारांचा सामना भाजपला करावा लागणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button