breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे पदवीधर मतदारसंघातून संभाजी बिग्रेड उतरणार मैदानात

सोलापूरचे इंजिनिअर मनोजकुमार गायकवाड यांची उमेदवार जाहीर

पुणे |महाईन्यूज|

पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची धावपळ सुरु आहे. शिव, शाहू, फुले-आंबेडकर यांच्या कृतीशील विचारांची परंपरा घेऊन चालणारे आणि शंभर टक्के समाजकारण आणि राजकारण करणा-या संभाजी बिग्रेडने मैदानात उतरण्याची निर्णय घेतला. त्यानूसार सोलापूरचे उच्चविद्या विभूषित मनोजकुमार गायकवाड यांना उमेदवार जाहीर करण्यात आली आहे.

गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या पक्ष संघटन वाढीमध्ये चांगले येगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली आहेत. शिक्षण, विध्यार्थी, शिक्षक कर्मचारी, राज्यातील पदविका धारक यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. पदवीधर विद्यार्थी, विद्यार्थिणी त्यांच्या न्याय हक्कासाठी निवेदन, मोर्चा आणि आंदोलन उभारुन न्याय देण्याचा प्रयत्न केला. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाला पाठिंबा देत लढा चालू ठेवला. त्या लढ्याला काही प्रमाणात यश ही आले.

अभ्यासू, प्रशासनाची जाण आणि बहूजन विचारधारेचे उमेदवार मनोजकुमार गायकवाड हे आहेत. बहुजन विचारधारा जनमानसात रुजवीण्याच्या दृष्टीने संभाजी ब्रिगेडने उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर या जिल्ह्यातील कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी बहुजन विचारधारा, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत रुजविण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार इंजिनिअर मनोजकुमार गायकवाड यांना देण्यात आली आहे. त्यामुळे गायकवाड यांना सर्वाधिक पसंती द्यावी, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रविण कदम यानी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button