breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी शाम साठे
![Pune District Artist, Sangachaya, Vice President, Shaadi Sathe](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/sham-sathe.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी शाम साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे जेष्ठ सल्लागार हुसेन खान, उपाध्यक्ष किरण सरोदे यांनी त्याबाबतचे नियुक्ती पत्र दिले आहे. ३० जानेवारीपासून साठे यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाने प्रसिद्धिपत्रकद्वारे दिली.
प्रसिद्धिपत्रकात नमुद केले आहे की, पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ कलाशिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर असते. कला शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असते. या संघावर कला शिक्षकांना न्याय देण्यासाठी उपाध्यक्षपदी शाम साठे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेची ध्येय धोरणे, शिस्त याला कटिबद्ध असल्यानेच ही निवड केली असल्याची माहिती या वेळी संघटनेने दिली.