breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पिस्तुलं विकणाऱ्या कोल्हापुरच्या इसमाला गोव्यात अटक

पणजी : गोव्यात पिस्तुले आणून विकणाऱ्या विवेक झुवारी या कोल्हापूर येथील इसमाला  चिंबल येथील रिक्षावाल्याला जुने गोवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि ५ जिवंत राउंड्स जप्त केले. तो चिंबल – तिसवाडी येथे राहत होता.

विवेक हा रिक्षाव्यवसायात कमी आणि अनाधिकृत धंद्यात अधिक असे लोक त्याच्याविषयी बोलत होते. परंतु शुक्रवारी पुराव्यासह त्याला अटक करण्यास जुने गोवा पोलिसांना यश मिळाले. चिंबल – तिसवाडी येथील एका सुलभ सौचालयाजवळच पिस्तुल व राउंडसह त्याला अटक करण्यात आल्याची माहिती जुने गोवे पोलीसांनी दिली. निरीक्षक सुदेश वेळीप यांच्या नेतृत्वाखाली, उपनिरीक्षक प्रियंका सावंत, कॉन्स्टेबल  नितीन हळर्णकर, सर्वेश गावस, प्रजत शेट्ये, कॅजिटन नुनूस व अनिकेत देविदास यांनी त्याला पकडण्यात यश मिळविले. विवेकचे कारनामे त्याच्या काही सहकाऱ्यांना ठाऊक होते. त्यांनीच ही माहिती पोलिसांना दिली. पिस्तुल घेऊन तो अमूक ठिकाणी जाणार याची माहितीही पोलिसांनी मिळविली. परंतु ही पिस्तुल नेमकी कुणाला विकली जाणार होती, तसेच यापूर्वी असे किती व्यवहार त्याने केले आहेत याची माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत. सध्या संशयित पोलिसांच्या कोठडीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button