पाण्याच्या टाकीत पडून 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
![NCRB report Mumbai at second in crime against women](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/crime-1-1.jpg)
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पतंगाचा मांज्या एक मुलाच्या जीवावर बेतला. पतंगीचा मांजा काढताना पाण्याच्या टाकीत पडून अकरा वर्षाच्या अथर्व गोरे या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील तुकाई नगर इथं घडली.
मृत अथर्व गोरे हा तुकाईनगर मधील वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीवर अडकलेला मांज्या काढण्यासाठी चढला होता. मांजा काढत असताना तो अथर्वचा पायात अडकला आणि तोल जाऊन तो झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडला. यात त्याचा बुडून मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या टाकीला झाकण नाही आणि या ठिकाणी सुरक्षारक्षक ही या नसल्याने अनेक मुले टाकीवर जातात. अथर्व ही त्याच्या भावाबरोबर टाकीवर चढला होतात. त्याच दरम्यान ही घटना घडली. जर टाकीला झाकण असते किंवा सुरक्षारक्षक जरी असता तर हा आपघात झालंच नसल्याचं मत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहे. 13 वर्षांच्या अथर्वच्या मृत्यूमुळे गोरे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.