breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

निवडणूक आयोग ही भाजपचीच एक शाखा – खासदार संजय राऊत

पुणे |महाईन्यूज|

बिहारमधील जाहीरनाम्यात भाजपने करोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. याविरोधात आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. हा आचारसंहितेचा भंग असल्याचे गोखले यांनी नमूद केले होते. मात्र, आयोगाने तक्रार फेटाळत भाजपला क्लीन चिट दिली. यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग ही भाजपचीच एक शाखा आहे. त्यांच्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवता येणार नाही. असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.

पुणे येथे संजय राऊत यांचा आज वार्तालाप झाला. यावेळी बिहारबद्दल त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी बिहारच्या निवडणुकीकडे फक्त देशाचेच नाही तर जगाचे लक्ष लागले आहे, असे सांगितले. ‘बिहारमध्ये एक तरुण मुलगा लढत आहे आणि त्याने आव्हान निर्माण केले आहे. काहीही गडबड नाही झाली आणि तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर त्यात मला अजिबात आश्चर्य वाटणार आहे’, असे सांगत बिहारमध्ये सद्यस्थितीत तेजस्वी आघाडीवर असल्याचे सांगण्याचाच राऊत यांनी प्रयत्न केला.

‘कोणाच्याही आधाराशिवाय तेजस्वी यादव बिहारमध्ये सर्वांना आव्हान देत आहेत. त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य कारागृहात आहे. सीबीआय आणि आयकर विभाग त्यांच्या मागे लागले आहेत. असे असतानाही न डगमगता आव्हान उभे करणे सोपे नाही’, अशा शब्दांत राऊत यांनी तेजस्वी यांची स्तुती केली. अनेक राज्यांमध्ये प्रमुख नेत्यांची मुलं राजकारणात उतरली आहेत. त्यात मला तेजस्वी यादव सर्वात उजवे वाटतात. मी बऱ्याच वर्षांपासून त्यांना पाहतोय. काहींना ते कमकुवत वाटतात पण मला तसे वाटत नाही. एक सक्षम नेता मला त्यांच्यात दिसतो, असेही राऊत पुढे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button