‘निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे’, अजित पवारांचे टीकास्त्र
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप, त्यापाठोपाठ नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे.
वाचा :-‘कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा ना संत्री’, गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना भाजप नेते निलेश राणे यांनी इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती. या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
निलेश राणेंनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, अजित पवार म्हणाले की, ते वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का? पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असा टोला पवारांनी लगावला.
दरम्यान, नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर निलेश राणेंनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. ते वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का? पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे ट्विट त्यांनी केले होते.