नाशिक-पुणे हवाई प्रवास केवळ एक तासात, 27 ऑक्टोबरचा शुभ मुहूर्त
पुणे, महाईन्यूज
गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेली नाशिक-पुणे विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. एअर इंडियाची उपकंपनी अलायन्स एअरद्वारे येत्या 27 ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होणार आहे. दोन्ही शहरे हवाई मार्गाद्वारे एकमेकांना जोडली जाणार आहेत.
रस्ते मार्गाने नाशिकहून पुण्याला जाण्यासाठी किमान पाच तासांचा अवधी लागतो. मात्र, विमानसेवा सुरू झाल्यास अवघ्या तासाभरात पुणे गाठता येणार आहे. या सेवेचे बुकींग काही दिवसांपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार ही सेवा सुरू राहणार आहे. 70 आसनी क्षमता असलेल्या या विमानात पन्नास टक्के जागा या उडान योजनेंतर्गत राखीव असतील, उडान अंतर्गत 1620 रुपये तिकिट दर निश्चित करण्यात आला आहे.
दुपारी तीन वाजता विमान नाशिकहून (ओझर) निघेल आणि पुण्याला चार वाजता पोहचेल. पुण्याहून दुपारी साडेचार वाजता हे विमान नाशिकसाठी निघेल आणि सायंकाळी साडेपाचला पोहचेल.




