Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/img-20201107-wa0251_202011515107.jpg)
संगमनेर – नाशिक – पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात झाला आहे. ही सर्व वाहने पुण्याकडून नाशिकच्या दिशेने निघाली होती. शनिवारी ( ७ ऑक्टोंबर) दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमींना रुग्णालयांमध्ये उपचारात दाखल केले असून त्यांची नावेेेे अद्याप समजली नाहीत. महामार्गावर वाहतूक कोंडी होवू लागल्याने रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.