breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

ध्येयवेड्या अनंता डोईफोडेच्या जिद्दीला राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांची ‘साथ’

पुणे जिल्ह्यातील पानशेतमधील विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत

अनंताचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत साथ देण्याचे केला संकल्प

पुणे । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपण आणखी एक आदर्श निर्माण केला आहे. दहावीचे शिक्षण घेण्यासाठी तब्बल २२ किमी पायपीट करणाऱ्या अनंता डोईफोडे या विद्यार्थ्याला सायकल भेट देत, आगामी शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचा संकल्प पवार यांनी केला आहे. त्यामुळे अनंताच्या जिद्दीला आता पार्थ पवार यांची ‘साथ’ मिळाली आहे.

पुणे जिल्ह्यातील पानशेत या दुर्गम भागात राहणाऱ्या अनंता डोईफोडे याने दहावीच्या परीक्षेत 82 टक्के गुण मिळवले. मात्र, अनंताच्या शिक्षणाची कथा निश्चितच इतर मुलांप्रमाणे नाही. कारण, आपल्या शाळेत पोहोचण्यासाठी अनंताला आजही दररोज 4 तास पायपीट करावी लागते. घरापासून 11 किमी अंतरावर असलेल्या शाळेत जाऊन अनंताने आपले दहावीचे शिक्षण पूर्ण केले. दररोज 22 किमी अंतर पायाने कापून त्याने मेहनत व कष्टाने हे यश मिळवले आहे. त्यामुळेच, पार्थ पवार यांनी अनंताची भेट घेऊन त्याच्या कष्टाचं आणि यशाचं कौतुक केलंय. अनंताल भविष्यात आयएएस अधिकारी व्हायचयं, त्याच्या प्रयत्नातून तो नक्कीच तिथपर्यंत मजल मारेल, अशा विश्वासही पार्थ यांनी व्यक्त केला आहे.

अनंताला युपीएससी परीक्षेत यशस्वी व्हायचेय…

दहावीला असताना मी दररोज पहाटे 4 वाजता उठून सकाळी 6 वाजेपर्यंत अभ्यास करत असे. त्यानंतर, 1 तास झोपून पुन्हा शाळेला जाण्यासाठी तयार होत. तर, शाळेतून परत आल्यानंतर तो रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असे. अनंताची घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असून घरातील ३ भावंडांमध्ये तो सर्वात मोठा आहे. त्याचे वडिल हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात. अनंताने दहावीच्या परीक्षेत 82 टक्के गुण मिळवले असून आता पुढील शिक्षणासाठी तो पुण्याला जायची इच्छा व्यक्त करत आहे. भविष्यात ‘युपीएससी’ परीक्षेतून अधिकारी होण्याचं स्वप्न अनंताने बाळगलं आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button