धक्कादायक! पुण्यात पोलीस स्टेशनमध्येच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न!
पुणे – सध्या आजकाल आत्महत्या करण्याच्या घटना वारंवार कानावर पडत आहेत. यातच भर म्हणजेच पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छतागृहाची काच फोडून महिलेनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वाचा :-व्यापारी गाळे असून अडचण अन नसून खोळंबा
रविवारी म्हणजेच 13 डिसेंबर रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार साधारण दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास घडला. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेच नाव ऊज्वला भाऊ चोरगे असून त्यांचं वय 30 वर्षे आहे.
वाचा :-दर्जेदार महामार्गासाठी व्यापक जनआंदोलन उभारणार
त्यानंतर चौकशी दरम्यान उज्वला यांनी लघुशंकेचा बहाणा करत त्या पोलीस ठाण्यातील महिला स्वच्छतागृहात गेल्या. तेथील आरशाची काच फोडून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी उज्वला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.