धक्कादायक : पाळणाघरात तीन वर्षांच्या चिमुकलीवर दोन तरूणांनी केला लैंगिक अत्याचार
![Shocking! The director of the NGO was sexually abusing the nursing students under the guise of taking a 'restraint' test](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/images_1517817513248_rape.jpg)
पुणे – आई-वडील असे दोघेही नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मुलांना पाळणाघरात ठेवले जाते. पुण्यातील कोथरूड येथे असणाऱ्या एका पाळणाघरात तीन वर्षांच्या चिमुकलीवर दोन तरूणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी तिघांच्या विरोधात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पाळणाघरचालक महिलेसह दोन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे.
तक्ररदार या नोकरी करतात. त्यामुळे त्या त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीला कोथरूडमधील एका घरगुती पाळणाघरात ठेवत होत्या. पाळणाघरचालक महिलेचा १७ वर्षांचा मुलगा आणि त्याचा १८ वर्षांचा मित्र हे पीडित मुलीवर अत्याचार करत होते. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पीडित मुलगी घरी गेल्यानंतर कपडे काढून झोपत होती. पालकांना हा विचित्र प्रकार वाटला. त्यामुळे त्यांनी त्या मुलीकडे चौकशी केली. त्या वेळी तिने पाळणाघर येथील दादानेच असे कारायचे असल्याचे सांगितले. त्यांनंतर अधिक चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
शुक्रवारी पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केले. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी त्याला चार सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.