Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
थंड चहा दिल्याने पत्नीला बेदम मारहाण
पिंपरी ( महा ई न्यूज) – चहा थंड दिल्याच्या कारणावरून पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी, भोसरी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना खंडेवस्ती, भोसरी येथे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता महेंद्र भालेराव (वय ३०, खंडेवस्ती) यांनी पतीविरोधात फिर्याद दिली आहे. महेंद्र भीमराव भालेराव (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. थंड चहा दिल्याच्या कारणावरून चिडून आरोपीने पत्नीला लोखंडी रॉडने मारले. तसेच ती घराबाहेर जात असताना, कठीण वस्तू फेकून मारून जखमी केले.