तरुणीवर सामूहिक बलात्कार; वडिलांचा पोलीस ठाण्यातच मृत्यू
![Four women from the same family were raped in Rajasthan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/rape-case_201707340.jpg)
पुणे – उसाच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यासह कुटुंबाला डांबून ठेवण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथे आॅक्टोबरपासून हा प्रकार सुरू होता. तक्रार द्यायला आलेल्या पीडितेच्या वडिलांचा पोलीस ठाण्यातच बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. पीडित तरुणी, कुटुंबीय आणि आरोपी परप्रांतीय आहेत.
आरोपींनी १७ आॅक्टोबर रोजी साडेसात हजार रुपये देऊन दौंड येथून दिल्लीला जाणा-या रेल्वेमध्ये या कुटुंबाला बसवून दिले आणि कोणाला काही सांगितल्यास जिवे मारू अशी धमकी दिली. मात्र, पीडितेने कुटुंबीयांसोबत गंगाहर पोलीस ठाणे (ता. रुडकी, उत्तराखंड) येथे फिर्याद दिली. ती यवत पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यावरून मोहसीन व दिलवाज यांना अटक केलीे. दरम्यान, पीडिता व तिचे वडील मंगळवारी यवत पोलीस ठाण्यात आले. तेथे वडिलांचा बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.