तरुणाने डोक्यात गोळी झाडत केली आत्महत्या
पुणे |महाईन्यूज|
दौंडमध्ये एका युवकाने डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दादा लक्ष्मणराव नलगे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दादा नलगे यांनी आपल्याकडे असणाऱ्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली.
दौंड पोलीस स्टेशन शेजारील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळ असणाऱ्या तारामती इमारतीमध्ये दादा नलगे यांनी आत्महत्या केली. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नलगे यांच्या आत्महत्येची नोंद दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नलगे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पुणे इथं सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयत दादा नलगे यांच्या कुटुंबीयांनी दौंड पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आजारपणामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.