ज्येष्ठ वकीलांच्या मारहाणीचा बार असोसिएशनकडून निषेध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/c89a5e06408f6a7d674b5dddca8d3212_L.jpg)
पिंपरी- मोरवाडी न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ गोविंद भालेराव यांना धमकी देत विरोधी पक्षकाराने मारहाण केल्याची तक्रार पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनने पोलिसांकडे केली आहे. या मारहाणीचा बार असोसिेएशनने सभा घेऊन निषेध केला आहे.
यावेळी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे शिस्तपालन समितीचे सदस्य अॅड. सतीश लांडगे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तसेच, संबंधित महिलेच्या विरोधात काययदेशीर तक्रार पिंपरीतील संत तुकाराम पोलीस चौकीत देण्यात आली आहे. या प्रसंगी पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. कालिदास इंगळे, सचिव अॅड. तुकाराम पडवळे, ऑडीटर अॅड. गणेश राऊत, अॅड. प्रसन्न लोखंडे, अॅड. रविराज मीरचंदानी, अॅड. सुनील कड, अॅड.सुनील कडूसकर, अॅड. देविदास कुदळे, अॅड. सविता तोडकर, अॅड. शशिकांत गावडे, अॅड. मयूर लोढा, अॅड. योगेश थंबा, अॅड. संभाजी बवले आदी उपस्थित होते.