breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जेजुरीतून दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करणारे आरोपी गजाआड

पुणे – लग्नाला सात वर्षे होऊनही मूलबाळ होत नव्हते यामुळे जेजुरीच्या एमआयडीसी भागातून एका दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सागर पांडुरंग खरात असे या अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्या लग्नाला दीड वर्ष झाले होते.

दीड वर्ष होऊनही आपल्याला मूलबाळ होत नव्हते. समाजात आपल्याला नावे ठेवली जात होती म्हणून आपण मुलीचे अपहरण केले, असे आरोपी म्हणाला. मे महिन्यातील 31 तारखेला सागरने जेजुरी परिसरात राहणाऱ्या सुरेखा विनोद भैसारे यांची दीड वर्षांची मुलगी जान्हवीचे अपहरण करून कोळवाडी परिसरात ठेवले होते. अथक प्रयत्न करूनही अपहरकर्ता पोलिसांना सापडत नव्हता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसानी आरोपीची ओळख पटवली आणि शुक्रवारी सायकांळी त्याला हडपसर परिसरातून अटक करून जानव्हीची सुखरूप सुटका केली. चिमुरडीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button