breaking-newsताज्या घडामोडीपुणे

छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह लेखन करणा-या श्री श्री रविशंकर यांच्या गुन्हा दाखल करा

… अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करु, जिल्हाधिका-यांना निवेदन

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

अखंड भारताचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल श्री श्री रविशंकर यांनी आक्षेपार्ह लेखन केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांनी दिला आहे.

याबाबत पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, अखंड भारताचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांची आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉसाहेब असताना देखील श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणीव पुर्वक कमी लेखुण समर्थ रामदास स्वामींचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच शिवाजी महाराज आपले राज्य सांभाळून व लढाया करुन थकुण गेले आहेत असे दाखवून रामदास स्वामी स्वराज्याचे राजे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिष्य आहेत. ते रामदासाच्या पायाजवळ आपले गुडघे टेकून आपला मुकुट, तलवार रामदासाच्या चरणी अर्पण करून या स्वराज्याचा मीच राजा आहे. तु शिपाई म्हणून माझे काम कर असे रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलेचा व्हिडिओ आपल्या यु ट्युब चैनलवर श्री श्री रविशंकर यांनी
प्रसारीत केलेला आहे.

याशिवाय या आशयाचा लेख प्रकाशित केलेला असल्यामुळे माझ्या व महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी जनतेच्या धार्मिक श्रधांचा अपमान केलेला आहे. त्यामुळे श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी आम्ही पोलीस निरीक्षक वाकड, पोलीस उपायुक्त परीमंडल १ तसेच पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांना एक महिन्यापासून निवेदने देऊन देखील श्री श्री रविशंकर यांचेवर आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आपण स्वतः व्यक्तीशा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात ठोस पावले उचलावीत, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सतीश काळे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button