breaking-newsताज्या घडामोडीपुणे

चाकण एमआयडीसीतील ‘दादा’च्या आवळल्या मुसक्या ; ‘जागते रहो’ अभियान

चाकण –  चाकण औद्योगिक वसाहतीमधील लूटमार, दरोडे, चोऱ्या, दादागिरीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसू लागला आहे. पोलिसांनी दिवस-रात्र एमआयडीसीत गस्तीपथक सुरू करण्यात आले आहे. यामुळे कामगार व उद्योजकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आैद्योगिक परिसरातील दादांना चांगलाच चाप लागणार आहे.  

चाकण औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामगारांना रात्री-अपरात्री छोट्या मोठ्या लूटमारीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी कामगार काम करण्यास टाळाटाळ करीत होते. तसेच, ठेकेदारीसाठी कंपनी व्यवस्थापन अधिकारी व उद्योजकांनाही धमकावण्याचे प्रकार घडत होते. या सगळ्या गोष्टींमुळे एमआयडीसीत असुरक्षेची भावना निर्माण झाली होती.

एमआयडीसीमध्ये रॉबरी टोळ्यांनी अनेक दरोडे टाकले होते. एमआयडीसीमधूनच दरोड्याच्या तयारीत असतानाच घातक शास्त्रांसह तीन टोळ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी कामगारांना हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करणारे अनेक जण गजाआड झाल्याने लूटमारीच्या घटनांना काही प्रमाणात पायबंद बसला आहे. अनेक चो-यांमध्ये कंपनीच्या सुरक्षारक्षकांचाच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. साप्ताहिक सुटीच्या दिवशी व रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरणा-यांना गस्तीवरील पथकाच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भुरट्या चो-यांवर आळा बसला आहे.

औद्योगिक वसाहतीत ‘जागते रहो’ अभियान सुरू करण्यात आले आहे. तसेच, औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारी कारवाया करणा-या व पूर्वीच्या विविध गुन्ह्यांत हवे असलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली जात आहे. गुन्हेगारांचे नेटवर्क पोलिसांना तोडण्यात यश मिळाले आहे. मागील काही दिवसांमध्ये गस्तीपथकाने रात्रीच्या वेळी अवैधरीत्या गावठी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुसे विकण्याचा प्रयत्न करणा-यांना शिताफीने अटक करण्यात आली आहे. औद्योगिक वसाहतीत कामाचे ठेके आपल्यालाच मिळावेत, यासाठी उद्योजकांना व कंपनी अधिका-यांना धमकावणा-यांना गजाआड करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button