breaking-newsताज्या घडामोडीपुणे

चंद्रमानगर झोपड्पट्टीवासियांचे शासनाच्या निषेधार्थ तिरडी आंदोलन

– भीम बटालियन संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन

पुणे | प्रतिनिधी

प्रभाग २ मधील चंद्रमानगर, येरवडा येथील झोपड्पट्टीवासियांच्या वतीने तिरडी आंदोलन घेण्यात आले. भीम बटालियन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले. गेल्या १० वर्षांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी प्रतिकात्मक तिरडी घेऊन शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

भीम बटालियन संघटनेच्या संस्थापिका आम्रपाली धिवार, मंगल बाबर आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात चंद्रमानगर, येरवडा येथील नागरिक उपस्थित होते.

गेल्या १० वर्षांपासुन चंद्रमानगर झोपड्पट्टीवासियांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन देखील दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या संबधित विभागाकडे वारंवार निवेदने देऊनही त्यावर सकारात्मक तोडगा काढला जात नाही. नागरिकांनी केलेल्या मागण्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

या मध्ये बीएसयूपी अंतर्गत असणारी २७४ चौरस फुटापर्यंत कारपेट एरियाची घरे तत्त्काळ बांधुन द्यावीत. सध्या नागरिक राहत असलेल्या पत्र्याच्या घरात पिण्याच्या पाण्याची, विजेची व ड्रेनेजची व्यवस्था करावी. या प्रकरणात असणारे भ्रष्ट अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच संबधित अधिकारी व लोकप्रतिनिधींची ईडीची चौकशी करावी, अशी मागणी भीम बटालियनच्या संस्थापिका आम्रपाली धिवार यांनी केली.

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button