breaking-newsपुणे

चंद्रकात पाटील यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या मुख्यसुत्रधाराला अटक

पुणे : ‘चंद्रकांत पाटील यांचा पी. ए बोलतोय’, असे म्हणत रुग्णालयाकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागणाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल अरून शेंडगे (रा.कोंढवा), किरण धन्यकुमार शिंदे (रा.लोहीयानगर) अशी अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराची नाव आहे.

यापूर्वी पोलीसांनी याच गुन्ह्यांतील त्यांचा साथीदार सौरभ संतोष अष्टूळ (वय. 21, रा.लोहीयानगर गंजपेठ, पुणे) याला बुधवारी (दि.22) अटक केली होती.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा प्रकार गंभीर असून आरोपीस पकडण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप विष्णोई यांनी विशेष सुचना देवून आरोपीच्या मोबाईलचे एस.डी.आर/सी.डी.आर टॉवर लोकेशनचा डाटा काढण्यास मार्गदर्शन केले व त्या प्रमाणे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 1 स्मिता पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या टिम तयार करण्यात आल्या होत्या.

आरोपीने पुण्यातील कौसर बाग येथे पैसे घेवून बोलाविले. नंतर थोडया वेळयाने आरोपीने अंलकार चौक येथे बोलाविले. पोलीस व्यापारी म्हणून पैसे देण्यास गेले.

आरोपी पैसे घेण्यास येताच व्यापारी म्हणून गेलेल्या तपास पथकातील पोलीसांनी आरोपी सौरभ संतोष अष्टूळ ( वय.21, रा.लोहीयानगर गंजपेठ पुणे) याला अटक केली. त्याच्याकडील चौकशीत या गुन्ह्यात इतर दोन आरोपी असल्याचे निष्पण झाले.

त्यानुसार आरोपी विशाल अरून शेंडगे (रा.कोंढवा) आणि किरण धन्यकुमार शिंदे (रा.लोहीयानगर) यांना पोलीस हवालदार किशोर पंढेर,पोलीस नाईक रमेश मावसकर, पोलीस शिपाई विजय बोडके, पोलीस शिपाई भूपेद्र चौधरी यांनी गुरुवारी (दि.23) रात्री पुणे शहरातून ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड‌ संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिचंवड रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, महेंद्र आहेर, किशोर पढेर, मच्छिद्र घनवट, सतिश ढोले, विलास केकाण, सुनिल जाधव,रमेश मावसकर,आत्मलिंग निंबाळकर, सोपान बोधवड, भुपेंद्र चौधरी, विनोद व्होनमाने, विजय बोडके, तुषार गेंगजे, राहुल मिसाळ,अमोल सांळूखे, दिपक जाधवर, तानाजी सोनवणे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button