घरातच राहा! पुणे जिल्हा पुन्हा ऑरेंज अलर्ट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/1Pune_20Heavy_20downfall.jpeg)
पुणे |महाईन्यूज|
पुणे जिल्ह्याला गुरूवारी पुन्हा हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात ६४.५ ते ११५.५ मिलीमीटर पाऊस कोसळेल असेही स्पष्ट केले.
शिवाजीनगर येथील वेधशाळेत बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ११२.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापैकी ७६ मिलीमीटर पाऊस बुधवारी रात्री साडेआठ ते साडेअकरा या वेळेत झाला. त्यामुळे पुणे पावसाच्या पाण्यात अक्षरश: वेढले गेले. रात्री बारा वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. रात्री साडेअकरा ते अडीच यावेळेत १५.४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. या पार्श्वभूमिवर हवामान खात्याने गुरूवारी परत पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण रहाणार आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने दिला. विजांचा गडगडाटासह हा पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहनही केले आहे.