गुन्हेगारांनो गुन्हेगारी सोडा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/DSC3829.jpg)
- नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांचा इशारा
पुणे – गुन्हेगारांनो गुन्हेगारी सोडा, असा इशारा पुणे शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिला आहे. डॉ. के. व्यंकटेशम मावळत्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून शुक्रवारी पदभार स्वीकारला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शहरातील गुन्हेगारी मोडण्याचे सूचक वक्तव्य केले.
पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद असून ही मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी टिकविण्याचे प्रयत्न केले जातील. पुणे शहरातील बडी कॉप योजनेची नागपूरमध्येही अंमलबजावणी करण्यात आली होती. सध्या जेवढ्या चांगल्या योजना सुरू आहेत, त्या पुढेही कायम ठेवल्या जातील असे ही डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले. राज्य गृह विभागाने सोमवारी अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली पुण्यात करण्यात आली. तर पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची मुंबईत अप्पर पोलीस महासंचालक (महामार्ग) म्हणून बदली करण्यात आली आहे.