breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोना संसर्ग; पंढरपूर विठ्ठल मंदिरात विशेष खबरदारी

पंढरपूर|महाईन्यूज|प्रतिनिधी

कोरोना व्हायरसने देशभरात धुमाकूळ घातला आहे. भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेले रूग्ण आढळल्यानंतर देशभरात भीतीच वातावरण आहे. महाराष्ट्र अद्यापही कोरोनाच्या लागणपासून दूर आहे. असं असलं तरीही महाराष्ट्र सरकारने कोरोनाशी दोन हात यंत्रणा सज्ज केली आहे. असं असताना आता पंढरपूरातही कोरोनापासून लांब राहण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. आणि कोरोना व्हायरसचा संसर्ग सार्वजनिक ठिकाणी होण्याची शक्यता अधिक आहे.

म्हणून पंढरपूरचं श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर कोरोनापासून दूर राहावं म्हणून दिवसातून सहा ते सात वेळा स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी रोज मोठ्या संख्येनं भक्तगण येत असतात. त्यामुळे मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत भाविकांनी मास्कचा वापर करणार असल्याचे फलकही लावण्यात येणारेत. दरम्यान कोरोनासंदर्भात काय काळजी घेतली जावी अशा आशयाचे फलकही लावले जाणार आहेत.

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यातील यंत्रणाही सज्ज असल्याची माहिती आरेग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलीय. कोरोनापासून वाचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कचा, औषधांचा राज्य सरकारकडे योग्य पुरवठा असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button